Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूज'संपर्कात रहा, वेळोवेळी भेटत जा, नाही तर...'; महिला मॅनेजरसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या...

‘संपर्कात रहा, वेळोवेळी भेटत जा, नाही तर…’; महिला मॅनेजरसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकावर गुन्हा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला मॅनेजरसोबत वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश नयनमल कलानी (रा. शहनशाह सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात आणि कंपनीच्या बाहेर ५ मार्चपासून ३ जून पर्यंत वेळोवेळी घडला आहे.

पोलिसांनी द्विलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. या कंपनीत पीडित महिला सिनियर कॉपोरेंट मॅनेजर या पदावर काम करते. आरोपीने फिर्यादी यांना वारंवार संपर्क साधून त्यांच्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फिर्यादी या राहत असलेल्या पत्त्यावर भेट वस्तू पाठवल्या. त्या जीममध्ये जात असताना व तिथून घरी परत जात असताना आरोपीने सतत पाठलाग केला. तसेच ऑफिसच्या कामानिमित्त केबीनमध्ये बोलवून अश्लील स्पर्श करून जवळीक साधून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. फिर्यादी यांना संपर्कात रहा व वेळोवेळी भेटत जा, नाही तर माझ्याकडे असलेले पार्टीचे व तुझ्यासोबतचे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments