Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजसंत सेवालाल महाराजांच्या जयंतीत अश्लील चाळे करत अल्पवयीन मुलाचा नाच; समुपदेशनासाठी बाल...

संत सेवालाल महाराजांच्या जयंतीत अश्लील चाळे करत अल्पवयीन मुलाचा नाच; समुपदेशनासाठी बाल न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः संत सेवालाल महाराज जयंती निमित्त लक्ष्मीनगर, लमान तांडा, सेवालाल चौक या परिसरातील मिरवणुकीत एक मुलगा अश्लील चाळे करून नाच करत असतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वायरल झाला होता. ही घटना येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी मुलाची आई चांदबाई निळू पवार, (35 वर्ष, राहणार – नाईक नगर, येरवडा पुणे) यांना मुलाने केलेल्या प्रकाराबाबत अवगत करून, त्यांना नोटीस देण्यात आली आहे.

येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्हिडिओमध्ये असलेल्या अल्पवयीन मुलाचा लमान तांडा नाईक, नगर येरवडा परिसरात शोध घेतला असता मुलगा सापडला आहे. तो विधीसंधर्ष ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. नाईक नगर येरवडा पुणे येथे आई-वडिलांच्या सह भाड्याने राहत असून, तो मूळ यादगिरी, जिल्हा गुलबर्गा, राज्य कर्नाटक येथील राहणारा आहे. सदर मुलगा कोणत्या मंडळ सदस्य नसून, तो कार्यक्रम पाहण्यासाठी सेवालाल चौक येथे आलेला होता. हा मुलगा सेवालाल चौक येथील कात्रज डेअरीच्या अधिकृत स्टॉलवर चढून पत्र्यावर विभत्स डान्स करित होता.

या प्रकरणी, येरवडा पोलिसांनी सदर मुलाची आई चांदबाई निळू पवार, (35 वर्ष, राहणार नाईक नगर, येरवडा पुणे) यांना मुलांनी केलेल्या प्रकाराबाबत अवगत करून, त्यांना नोटीस देण्यात आली आहे. व सदर बालकाला समुपदेशनासाठी बाल न्यायालयात हजर करण्याबाबत समज पत्र देण्यात आले आहे. तसेच सदर बालकास दि. १७ फेब्रुवारी रोजी बाल न्याय मंडळ येथे हजर करण्याची तजवीज केली आहे. अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments