Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा : बारामती पोलिसांकडून डीजे धारकांना आवाहन, डीजे...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : बारामती पोलिसांकडून डीजे धारकांना आवाहन, डीजे लावल्यास होणार कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती : बारामती शहरात जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे (दि.06 जुलै व 07 जुलै) रोजी आगमन होणार आहे. यावेळी शहरात पालखी मार्गामध्ये डीजे स्पीकर धारकांनी कोणीही डीजे लावू नये, असे बारामती शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

पालखी मार्गावर डीजे लावल्यास डीजे लावणारे संबंधित व डीजे मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच डीजे जप्त करण्याची कारवाई करून योग्य त्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच पालखी मार्गात कोणीही अनाधिकृत कमानी उभारू नयेत. तसेच परवानगी घेतलेल्या कमानी स्टेज यामुळे जर पालखी मार्गात अडथळा निर्माण झाल्यासही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

विशेषतः देशमुख चौकामध्ये अनेक स्टेज मंडप उभारून तेथे स्पीकर लावले जातात. मागील वर्षी अशा डीजे व स्पीकर मुळे पालखी विश्वस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणीही स्पीकर लावताना परवानगी घेऊनच स्पीकर लावावे. तसेच पालखी आगमनाच्या वेळी संबंधित स्पीकर शक्यतो बंद ठेवण्यात यावेत, असेही आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments