इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
आळंदीः जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील सर्व अभंग महाराष्ट्र शासन ई बुक, ऑडिओ स्वरूपात आणणार असून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या जागेतील विकास आराखड्यासाठी देखील शासन निधी देणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आळंदी येथे दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व ओळख श्री ज्ञानेश्वरीची परिवाराकडून विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठीची ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा या दोन पुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून या पुस्तकांचे प्रकाशन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ओळख ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी सदर उपक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील मूल्य शिक्षणात घेण्याबाबत विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या काळात राज्य शासनातर्फे त्रिदिनी कीर्तन महोत्सव देखील आळंदीत राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.