इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असल्याने बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाकडून याबाबतचे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या व्हायरल फोटोमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास तीन महिन्याचा अवधी उलटला असून यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. बाकीच्या आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. या दरम्यान काल रात्री देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने संतापाची उसळली आहे. अत्यंत क्रूरतेने आणि बेदमपणे महाराण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला. त्यानंतर कडक बंद, बीड बंद… नराधमाच्या कौर्याचा निषेध करू.. एक दिवस कुलूप लावून शासनाचा निषेध करू, संतोष अण्णा आम्ही लढूच अशा आशयाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. देशमुख यांच्या हत्येचे सोशल मीडियावर आलेले धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ यामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दरम्यान संबंधित प्रकरण हे आता न्यायप्रविष्ठ असून फोटो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, त्यामुळे जनतेने हातात कायदा घेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
दरम्यान आरोपीच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमावर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे याप्रकरणी पोलीस प्रशासनाने शांततेच आव्हान केलं असलं तरी लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील तगडा पोलीस बंदोबस्त या बीडमध्ये तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पीए द्वारा आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांच्याकडे सुपूर्द केला.