इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नाशिक : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखयांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला. यानंतर तात्काळ पोलीसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. मात्र दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर सीसीटीव्हीत दिसलेला तो तरुण कृष्णा आंधळे असल्याचा पुरावा नाशिक पोलिसांना सापडलेला नाही. मोटारसायकलवर दिसलेला तरुण हा कृष्णा आंधळे आहे की नाही, याबाबत अजून स्पष्टता झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार झाला होता.. कृष्णा आंधळे या हत्या प्रकरणातील नववा आरोपी आहे. अखेर त्याच लोकेशन नाशिकमध्ये सापडल असल्याची माहिती समोर आली.माहिती मिळताच नाशिक पोलिसांकडून विविध पथके तैनात करून कृष्णा आंधळेचा शोध सुरु आहे. देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. या हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे तीन महिन्यापासून बीड पोलिसांसह सीआयडीला गुंगारा देत होता. अखेर या फरार कृष्णा आंधळेचं लोकेशन सापडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज द्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मोटर सायकलवर दिसलेला तरुण कृष्णा आंधळे हाच आहे. याचा ठोस पुरावा अद्याप देखील पोलिसांना सापडलेला नाही.
दरम्यान कृष्णा आंधळेच्या तपासासाठी पोलिसांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. तसेच गंगापूरच्या ग्रामीण हद्दीत पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे. स्थानिकांनी दावा केलेले तरुण मोटरसायकलवर जाताना दिसत आहेत. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही. या मोटारसायकलवर दिसलेला तरुण हा कृष्णा आंधळे आहे की नाही, याबाबत अजून स्पष्टता झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस अजूनही त्याचा शोध घेत आहेत.