इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अकोला: अकोल्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची मैत्रिण रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या. त्यावेळी नराधमाने तिला दुचाकीवरून घेऊन गेला. नराधम आरोपी मुलीला अकोट फैल भागात घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून परत पीडितेला रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडलं. पीडित मुलगी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. ती आपल्या मैत्रिणीकडे आली होती. अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून त्याचा शोध पोलिसांकडू घेतला जात आहे.