Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजसंतापजनक ! मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच शेतात उभारली ड्रग्सची फॅक्टरी, अन्य सात...

संतापजनक ! मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच शेतात उभारली ड्रग्सची फॅक्टरी, अन्य सात जणांचाही समावेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि तुळजापूर ड्रग्स प्रकरण चर्चेत आल असताना आता लातूरमध्ये देखील एमडी ड्रग्सचं कनेक्शन समोर आलआहे. मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यांनेच लातूरमध्ये ड्रग्सचा कारखाना उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी असलेला पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे हा मुंबई येथे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. हा हवालदार चाकूर तालुक्यातील रोहिना गावाचा रहिवाशी आहे. त्याच्या स्वतःच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तो ड्रग्सची निर्मिती करायचा. येथून तो, मुंबई, पुणे यासह इतर शहरात ड्रग्स पुरवत होता. यामुळे लातूर ड्रग्स प्रकरणाचं मुंबईशी कनेक्शन समोर आल आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली आहे.

या कारवाईत ११ किलो ६६ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय किंमत, १७ कोटी रुपये आहे. ड्रग्स प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस हवालदारासह सात जणांना पोलिसांनी अटक केलीय.

या प्रकरणातील पाच आरोपींना चाकूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात १) प्रमोद केंद्रे २) महंमद शेख ३) जुबेर मापकर ४) आहाद मेमन ५) अहमद खान, यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments