Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजसंतापजनक ! बदलापूरनंतर आता पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

संतापजनक ! बदलापूरनंतर आता पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाष्ट्रातील बदलापूर येथेही दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण पुढं आलं होतं. त्यानंतर आता पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धावत्या स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वानवडी येथे ही घटना घडली आहे. बसचालकाविरोधात वानवडी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलींना बसमधून शाळेत सोडण्यासाठी बसचालक जात होता. त्या बसमध्ये दोन्ही चिमुकलींना पुढच्या सीटवर बसवत असत. त्यावेळी आरोपी बसचालक चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुकलींना जवळ बसून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. याबद्दल कोणाला सांगू नको अशीही धमकी ही दिली होती.

शाळकरी अल्पवयीन चिमुकलीने तिच्या घरी गेल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या जागी त्रास होत असलेले घरी सांगितली त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. बस चालकाने सहा वर्ष चिमुकलीसह तिच्या मैत्रीणीवर मागील चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता. बसचालकाविरोधात वानवडी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments