Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजसंतापजनक...! पुण्यात ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

संतापजनक…! पुण्यात ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने ४ वर्षाच्या मुलीला आडोशाला घेऊन जात तिच्यासोबत असभ्य वर्तन करताना पिडीत मुलीच्या आईने त्याला पकडले. हा प्रकार रविवारी २६ मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरात घडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी नराधमावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या २४ वर्षीय आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून धनलाल छोटेलाल पासवान (वय-२६ रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या ४ वर्षाच्या मुलीला घराच्या जवळ आडबाजूला घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपीने मुलीसोबत अश्लील वर्तन केले. यावेळी पिडीत मुलीच्या आईने हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments