Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजसंतापजनक..! नराधमाने क्लासेसमध्ये मुलीची छेड काढून लिफ्टमध्ये अर्धा तास... नेमकं काय घडलं?

संतापजनक..! नराधमाने क्लासेसमध्ये मुलीची छेड काढून लिफ्टमध्ये अर्धा तास… नेमकं काय घडलं?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यात एका मुलीची छेड काढत तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील कात्रज गोकुळनगर येथील टाकळकर क्लासेसमध्ये घडली आहे. येथे परप्रांतीय कर्मचाऱ्याने मुलीची छेड काढून तिला अर्धा तास लिफ्टमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संतापजनक घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी संबंधिताला चांगलाच चोप दिला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच मनसैनिकांनी या परप्रांतीय तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी या परप्रांतीय तरुणाला जाब विचारत त्याला चांगलाच चोप दिला.

क्लासेसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम चालू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments