इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनी एकाला नग्न करत त्याच्या प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स लावल्याची संतापजन घटना घडली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तीन मित्रांनी मिळून जबरदस्तीने एका मित्राला कपडे काढायला भाग पाडून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ‘आयोडेक्स’ लावण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याच्या त्या नग्नावस्थेतील व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे.
श्रेयस संजय कवडे (वय वर्षे 19, हिंजवडी, मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय वर्षे 21, हिंजवडी, मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (वय वर्षे 35, हडपसर, मूळ रा. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 20 वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.