Wednesday, November 29, 2023
Home इंदापूर संततधार पावसाने तमाम वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या बुरुजाची पडझड

संततधार पावसाने तमाम वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या बुरुजाची पडझड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : गेल्या आठवडाभरापासून लागून राहिलेल्या संततधार पावसाने तमाम इंदापूरकरांचा मानबिंदू असणा-या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या प्रवेशद्वाराजवळच्या बुरुजाचा काही भाग ढासळल्याचा प्रकार आज (दि. २) उघडकीस आला आहे. गढाचे संवर्धन होण्याआधी ही पडझड रोखण्याचे उपाय योजावेत, अशी मागणी इंदापूरकरांकडून होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची कसबा पेठेनजीकची गढी हा इंदापूरकरांचा मानबिंदू आहे. ऐतिहासिक ठेवा असणा-या या गढीचे संवर्धन व्हावे अशी इंदापूरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र या पूर्वीचे तहसीलदार नागेश पाटील यांनी गढीच्या उत्तरेच्या भागाचे सपाटीकरण करुन तेथे रस्ता बनवण्याचा प्रकार केला. त्यामुळे गढीचा साचा बदलून गेला होता. त्या विरुध्द पहिल्यांदा माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी आवाज उठवला होता. या कारवाईच्या मागणीसाठी आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते आवाज उठवत राहिले. त्यानंतर प्रा. कृष्णा ताटे, पवन घोगरे यांच्या नेतृत्वाखालील गढी संवर्धन समितीने आंदोलनात्मक पावले उचलली. त्यामुळे गढीचे विद्रूपीकरण थांबले.

मध्यंतरीच्या काळात आ. दत्तात्रय भरणे यांनी संवर्धनाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ही भाजपच्या दारातून आपल्या परीने संवर्धनासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र या दोघांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात श्रेयवादाचा ही वास होता. या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी व व्हीसीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांची बैठक घेतली. मालोजीराजे यांची गढी व हजरत चाँदशाहवली दर्गाहच्या संवर्धन व सुशोभीकरणा संदर्भातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावेत असे आदेश दिले.

या पार्श्वभूमीवर संततधार पावसामुळे गढीच्या प्रवेशद्वाराजवळच्या बुरुजाचा काही भाग कोसळल्याचा प्रकार घडला आहे. सकाळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अहेमदरजा सय्यद, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार व इतरांनी त्या ठिकाणची पाहणी केली. या वेळी बोलताना श्रीधर बाब्रस म्हणाले की, ही गढी आम्हा सर्वांचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जपण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आ. दत्तात्रय भरणे प्रयत्नशील आहेत. संवर्धन होईल त्या वेळी होईल मात्र त्या आधी गढीच्या बुरुजाची पडझड रोखली जावी यासाठी नगरपरिषदाने डागडुजी करावी. या संदर्भात आपण इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याशी चर्चा केली आहे. नगरपरिषदेच्या अभियंत्यांना बुरुजाच्या पडझडीबाबत कल्पना दिली आहे. ते उद्या पाहणी करतील. त्यानंतर तातडीने पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती लोकमतशी बोलताना मुख्याधिकारी कापरे यांनी दिली.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments