Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज संगणक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे आमिषः पुण्यात एकाची 19 लाखांची फसवणूक, दुसऱ्या घटनेत...

संगणक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे आमिषः पुण्यात एकाची 19 लाखांची फसवणूक, दुसऱ्या घटनेत टास्कच्या बहाण्याने पावणेचार लाखांचा गंडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुलाला संगणक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 19 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे.

या प्रकरणी सुभाषचंद्र श्रीमुनीलाल शर्मा (वय 44, रा. ग्वालियर लाइन, वानवडी बाजार) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी विनोदकुमार शर्मा (रा. बुलंद, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2023 ते अद्यापर्यंतच्या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांचा मुलगा उमेश याला संगणक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. आरोपी विनोदकुमार यांनी त्यांना संगणक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर आरोपीने शर्मा यांना एका इमेलवर मुलाची माहिती पाठविण्यास सांगितली. मुलाला संगणक अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखविले.

त्यानंतर शर्मा यांना आरोपीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. शर्मा यांनी बँक खात्यात वेळोवेळी 19 लाख 9 हजार रुपये जमा केले. त्यानंतर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत.

टास्कच्या बहाण्याने पावणेचार लाखांचा गंडा

हडपसर परिसरात अमनोरा पार्क येथे राहणाऱ्या पवन कामशेट्टी (वय-22) या तरुणास अज्ञात आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून संर्पक केला. त्याला पार्ट टाईम जॉब टास्कच्या माध्यमातून देण्याचे अमिष दाखविण्यात आले. तक्रारदार याचा विश्वास संपादन करुन त्याने टास्क वेळेत पूर्ण केल्यास त्याला चांगला परतावा देतो असे सांगून आरोपींनी प्रिपेड टास्क करिता तक्रारदार याचेकडून 3 लाख 87 हजार रुपये ऑनलाइन बँकेच्या विविध खात्यावर घेऊन त्याची आर्थिक फसवणूक केली. याबाबत हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments