Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजश्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत बदल

श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत बदल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत (पुणे): श्री छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी शिरुरतालुक्यातील वढु बु. येथे साजरी होणार असुन या पार्श्वभूमीवर 28 मार्च रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 29 मार्च सकाळी 10 वाजेपर्यंत जड वाहतूक, माल वाहतूक (ट्रक, टेम्पो) आदी वाहनांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच शंभू भक्तांच्या वाहनांना थांब्याच्या ठिकाणापुढे (स्टॉपेज पॉईंट) वाहने घेवून जाण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

शंभू भक्तांची वाहने वगळता कोरेगांव भीमा बाजूकडून येणारी व वढू बु. मार्गे चाकण किंवा पाबळला जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भीमा-सणसवाडी-शिक्रापूर गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे चाकण, पाबळ बाजूकडे जाईल. चाकण, पाबळ बाजूकडून येणारी व वढू.बु कोरेगाव भीमा मार्गे पुणे बाजूकडे जाणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला- गॅस फाटा-शिक्रापूर- सणसवाडी-कोरेगाव भीमामार्गे पुणे बाजूकडे जाईल.

कोरेगाव भिमा बाजूकडून येणारी शंभू भक्तांची वाहने कोरेगाव भीमा-वढू मार्गावरील माहेर संस्थेजवळ असणाऱ्या स्टॉपेज पॉईटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments