Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजश्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रेची देवस्थान ट्रस्ट...

श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रेची देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासनाकडून जय्यत तयारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुरंदर (पुणे): श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा यात्रोत्सव आजपासून सुरू होत आहे. यासाठी एस.टी महामंडळ, आरोग्य विभाग, विद्युत मंडळ, देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत वीर यांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. आज सोमवार (१० जानेवारी) देवाला हळद लावून, यात्रेला सुरुवात होत आहे.

श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा यात्रोत्सव आजपासून सुरू होत आहे. ही यात्रा ११ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. २३ फेब्रुवारीला (मारामारी) रंगाचे शिंपण यात्रेची सांगता होणार आहे. यासाठी राज्यातून भाविक भक्त येत असतात, यात्रा काळात वीर या ठिकाणी चहू बाजूला भाविक गुलालात रंगून लालेलाल झालेले असतात.

यात्रेकरूंच्या आरोग्यासाठी पंचायत समिती पुरंदर आरोग्य विभाग सतर्क असून, आरोग्य सेवकांकडून पाणी शुद्धीकरण करून घेतले जाते. आरोग्य विभाग प्रमुख डॉ. विक्रम काळे, विद्युत मंडळ सुद्धा यात्रा काळात अखंडित वीज पुरवठा पुरवणार असल्याचे तालुका अधिकारी गणेश चांदणे यांनी सांगितले. एसटी महामंडळाची सेवा सुद्धा येणाऱ्या भाविकांना पुरवली जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचा बंदोबस्त करण्यात आला आहे. असे आगार प्रमुख सागर गाडे यांनी सांगितले. यासाठी प्रशासकीय बैठक घेऊन, आमदार विजय शिवतारे यांनी या संदर्भातील प्रशासनाला यात्रा कमिटीला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर्षी 13 दिवस श्रीनाथाची यात्रा असल्यामुळे यावर्षी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. देवस्थानकडून वीज, वाहनतळ, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. वीर गावामधील ग्राम स्वच्छता, दिवाबत्ती, गटारी स्वच्छता, तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाकीची निर्जंतुकीकरण केले आहे, यात्रा काळात भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे, वीरच्या विद्यमान सरपंच मंजुषा संतोष धुमाळ यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments