इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वीर (पुणे) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचेश्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी यांच्या श्रीक्षेत्र वीर नगरीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारी यात्रा आज श्रीनाथांच्या लग्न सोहळ्याने सुरवात झाली आहे. मंगळवार रोजी पहाटे ५.०० व पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर ६ वा. मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
देवाचा लग्नसोहळानिमित्त मंदिरात फुलांची विविध प्रकारची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यासाठी दिलीप जयसिंगराव धुमाळ (माजी विश्वस्त) व मित्र परिवार यांचेमार्फत नियोजन करण्यात आले. श्रीक्षेत्र कोडीतची काठी-पालखी घेऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सायंकाळी ७.४५ मि. श्रीक्षेत्र वीर येथे आली. यावेळी देवाची धुपारती घेऊन मुकादम-पाटील, विश्वस्त, मानकरी, दागीनदा सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटाभेट होऊन वाजत-गाजत रनागन कगागान शाले
त्यानंतर काठी-पालखी तळावर स्थानापन्न झाली. रात्रौ. ११.०० वा. समस्त राऊत मंडळीच्या वतीने देवाला पोशाख करून देव-देवतांना विवाह सोहळ्यासाठी आवाहन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीत उत्सवमूर्ती ठेऊन ढोल-ताश्याच्या गजरात तसेच कोडीतची पालखी बाहेरून अंधारचिंच येथे गेल्या. त्यावेळी मानकं-यांना (शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण) फुलाच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कण्हेरी पालख्यासह काठ्यांची भेटाभेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.
एक मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम-पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्रो २.४५ वा. लग्नविधीला सुरुवात होऊन मुकादम पाटील, पुरोहीत, गुरव, माळकरी यांच्या गाभाऱ्यातील उपस्थितीत मंगलाष्टके होऊन २.५५ वाजता लग्नसोहळा संपन्न झाला. मादिराबाहेरील लाखो भाविकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा संपन्न झाला. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला यावेळी आकर्षक फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
वीर गावचे मुकदम पाटील सोबत सर्व दागीनदार, सालकरी, मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरातील विधी करण्यात येत आहेत. यावेळी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र धुमाळ, व्हा. चेअरमन अमोल धुमाळ, विश्वस्त सुनील धुमाळ, विराज धुमाळ, काशिनाथ धुमाळ, अमोल धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगिर, जयवंत सोनवणे, प्रमिला देशमुख, अलका जाधव, सल्लागार इ. मंडळींनी ट्रस्टतर्फे व्यवस्था पहिली.