Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजश्रीगोंदा-मांडवगण रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ठ; एका महिन्यातच रस्ता खचलाः संभाजी ब्रिगेड

श्रीगोंदा-मांडवगण रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ठ; एका महिन्यातच रस्ता खचलाः संभाजी ब्रिगेड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीलगत नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ पद्धतीने सुरू आहे. तसेच या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ठ दर्जाचा मुरूम तसेच कालबाह्य मशिनरी वापरण्यात येत असल्याचे वारंवार सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला कळविण्यात आले होते.

सदर काम करणाऱ्या ठेकेदारास कामाचा योग्य अनुभव नसल्याने सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच काम सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बांधकाम प्रशासन निवडणुकीच्या कामत व्यस्त असताना घाईघाईने काम पुर्ण करण्यात आले. दरम्यान, एक महिन्याच्या आताच दुरुस्ती केलेला रस्ता पुर्णपणे खचला असून अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.

वरीष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी अहवाल तयार करुन संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत समाविष्ट करावे, तसेच ईतर कामाची देखील पाहणी करुन स्थगीती देण्यात यावी. या कामाचे योग्य पध्दतीने पुन्हा खोदकाम करुन दर्जेदार मटेरियल व योग्य मशिनरी वापरून सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे.

दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यात आला येतो. मात्र अशा बोगस कामांसाठी जनतेचा पैसा मुळीच खर्च करू दिला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments