इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अहिल्यानगरः अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील 32 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. महिलेला बिबट्याने हल्ला करून ओढून नेले असावे असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र, बेपत्ता झालेली महिला नेवासा येथील आपल्याच नातेवाईका सोबत गायब झाली होती. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षाची महिला बारागाव नांदूर आणि डिग्रसच्या शिवारात शेतात चारा आणायला गेली होती. मात्र, संध्याकाळी ती घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तिचा शेतात शोध घ्यायला सुरुवात केली. वन विभागाचे कर्मचारी व गावातील तरुणांनी महिलेचा रात्री 10 वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र, महिला कोठेही मिळून आली नाही. महिलेला बिबट्याने ओढून नेले असावे अशी शंका गावकऱ्यांनी उपस्थित केली. त्यानंतर राहुरी पोलिसांनी गायब झालेल्या महिलेचा तपास सुरू केला.
राहुरी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत संबंधित महिला नेवासा येथील नातेवाईकाबरोबर गायब झाल्याचे उघडकीस आणले.