इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती, (पुणे) : स्वमालकीच्या शेतात अफूची झाडे लावून त्याचीबेकायदेशीर शेती करणाऱ्याला सुपा पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र गेनबा कुतवळ (रा. पानसरेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 76 हजार रुपये किमतीची 8 किलो 497 ग्रॅम वजनाची अफूची बोंडे आणि झाडे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुतवळ यांची पानसरेवाडी परिसरात स्व मालकीची शेती आहे. पानसरेवाडी शिवारात कुतवळ यांनी स्वतःच्या शेतात अफूची झाडे लावल्याची गोपनीय माहिती सुपे पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी त्या ठिकाणी 76 हजार रुपये किमतीची 8 किलो 497 ग्रॅम वजनाची अफूची बोंडे आणि झाडे मिळून आली.
दरम्यान, कुतवळ यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सुपे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.