इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या एका 60 वर्षाच्या आजोबांनीच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी 60 वर्षाच्या आजोबांना अटक केली आहे. याबाबत मुलींच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोन्हीही मुली घराबाहेर खेळत होते. यावेळी शेजारी राहणाऱ्या 60 वर्षाच्या आजोबांनी त्यांना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवले. आणि त्यानंतर आपल्या घरी नेऊन वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. याघटनेबद्दल मुलींनी त्यांच्या आईला घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. यावेळी या घटनेची माहिती पोलीसांना कळवण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त आर राजा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.