Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजशेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याच्या आमिषः 86 लाखांची फसवणूक; वित्तीय संचालकाविरुद्ध फसवणुकीचा...

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याच्या आमिषः 86 लाखांची फसवणूक; वित्तीय संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एका गुंतवणूकदारास शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने 86 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खासगी वित्तीय संस्थेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी इन्कोफिना कन्सल्टंट कंपनीचे मालक, अमर बिरादार, चेतन मोरवाल, ज्ञानेश्वरी बिरादार (रा. सकाळनगर, बाणेर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका गुंतवणूकदाराने चतुः शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार डेक्कन जिमखाना भागात राहायला आहेत.

तक्रारदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अमिष इन्कोफिना कंपनीच्या संचालकांनी दाखविले होते. तक्रारदाराने कंपनीत 15 लाख रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर त्यांना कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. तपासात तक्रारदारासह अन्य गुंतवणुकदारांची 86 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस नांद्रे पुढील तपास करत आहेत.

ट्रक चालकाला चाकूच्या धाकाने लूटणारा जेरबंद

पुणे शहरातील मार्केट यार्डातील फळबाजारात ट्रकचालकाला चाकूच्या धाकाने एकास लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश उर्फ पक्या देवराम परिहार (रा. राम मंदिराजवळ, लोहियाननगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत किशोर भागचंद रोमण (वय ३१, रा. पोवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोमण मार्केट यार्डातील फळबाजारात शेतीमाल घेऊन आले होते. केळी बाजारात त्यांनी ट्रक लावला.

परिहारने रोमण यांना चाकूचा धाक दाखविला. रोमण यांच्या खिशातील मोबाइल आणि रोकड असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. या घटनेची माहिती रोमण यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी परिहारला ताब्यात घेतले. परिहार सराइत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments