Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजशेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाणा दिलाः ऑनलाइन 77 लाखांची केली फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाणा दिलाः ऑनलाइन 77 लाखांची केली फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फेसबुकवर एका अनोळखी व्यक्तीने बिझनेस ग्रुप मध्ये मोबाईल क्रमांक अॅड करुन शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने अॉनलाइन ७७ लाख ५० हजार रुपयांची अॉनलाइन अार्थिक फसवणुक करण्यात अाली अाहे. याप्रकरणी जिमीत मोदी, धनंजय सिंहा व मिकी चोपडा या अारोपींवर वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

सदरचा प्रकार ७/१२/२०२३ ते ७/२/२०२४ यादरम्यान घडला अाहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांचे राहते घरी असताना, फेसबुकवर एका अनोळखी १३३ वेल्स फॉर्च्यून बिझनेस स्कुल नावाचा व्हॉटसअप ग्रुप मिळाला.

त्यावर तक्रारदार यांनी लिंक अोपन करुन त्यांचा व्हॉटसअप नंबर वरुन त्या ग्रुप मध्ये सहभागी झाले. त्या ग्रुपचे वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक धारक अारोपी व जिमीतमोदी, धनंजय सिंह या अनोळखी व्यक्तीचे नावाने हा ग्रुप चालवला जात होता.

सदर व्हॉटसअॅप ग्रुपवर शेअर मार्केट अॅनालीसेस जिमीत मोदी व धनंजय सिंह हे करत असे व त्यांचा सहयोगी म्हणून मिका चोपडा हे काम पाहत होते. त्या क्लासची लिंक वेल्स लिव्ह ही होती. त्या लिंकवर शेअर मार्केट संबंधी रिकमेंडेशन त्यांचा सहयोगी मिका चोपडा हा करत असे. त्यांचे रिकमेंडेशन प्रमाणे तक्रारदार हे स्वतःच्या खात्यावर शेअर्स निवेश करत होते. त्यानंतर तक्रारदार यांना वेल्स स्टॉक अॅप नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास अारोपींनी सांगितले. त्यामध्ये नफा मिळेल व अयपीअो मिळण्याचे जास्त चान्सेस आहे असे सांगून तक्रारदार यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण ७७ लाख ५० हजार रुपये रण्यास भाग पाडून त्यांना कोणताही परतावा न देता तसेच गुंतवणुकीची मुळ रक्कम परत न करता सदर रकमेची फसवणुक करण्यात अाली अाहे. याबाबत वाकड पोलीस पुढील तपास करत आहे.

फ्रेंचाईजी देण्याचे बहाण्याने फसवणुक

पुण्यातील घोरपडे पेठ येथे राहणाऱ्या योगेश लालचंद ओसवाल (वय-४६) वस्तु विक्री करण्याची फ्रेंचाईजी देण्याच्या बहाण्याने अज्ञात अारोपीने त्यांच्याशी संर्पक साधला. त्यानंतर सदर फ्रेंचाईजी देण्याचे बहाण्याने वेगवेगळी कारणे सांगून अज्ञात आरोपीने एकूण पाच लाख रुपये अारोपीच्या खात्यात भरण्यास भाग पाडून सदर रकमेची फसवणुक केलीअाहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अज्ञात अारोपींवर गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments