Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजशेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे दिले आमिषः व्यापाऱ्यास 10.50 लाखांचा घातला गंडा; विमानतळ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे दिले आमिषः व्यापाऱ्यास 10.50 लाखांचा घातला गंडा; विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विमानतळ परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्यास शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगल्या प्रकारचा परतावा मिळेल असे आमिष दाखवून वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेऊन तब्बल साडेदहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत व्यापाऱ्याने विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार व्यपाऱ्याच्या या फेसबुक खात्यावर आरोपींकडून मेसेज पाठविण्यात आला होता. विराम बजाज असे नाव असलेल्या चोरट्याने त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकी करण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणुकीवर अल्पकाळात चांगला परतावा मिळेल, तसेच नवीन शेअर खरेदीबाबत माहिती देण्याचे आमिष दाखविले होते.

तक्रारदारास शेअर बाजारातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी एक अॅप देखील डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यानंतर चोरट्याने विविध बँक खात्यात तक्रारदारास पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराकडून वेळोवेळी 10 लाख 47 हजार 700 रुपये घेतले. पैसे जमा केल्यानंतर तक्रारदारास कोणताही परतावा दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार पुढील तपास करत आहेत.

टास्कच्या बहाण्याने सहा लाखांची फसवणुक

अज्ञात टेलिग्राम आयडी धारक, वेबसाईट, बेनिफिशियरी बँक अकाउंटधारक व वापरकर्ते यांनी पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या राहुल सुरेश तळेकर (वय 36 ) यांचा वर्क फ्रॉम होम ऑनलाइन टास्क देण्याचा बहाना करून विश्वास संपादन केला.

तळेकर यांना वेगवेगळे ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास, कमी काळात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून प्रीपेड टास्क करिता सहा लाख 19 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, सदर रकमेवर कोणताही परतावा तसेच मूळ रक्कम परत न करता संबंधित रकमेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments