Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजशेअर मार्केटमधून चांगल्या परताव्याचे आमिष पडले महागात; तरुणाची 26 लाखांची फसवणूक...

शेअर मार्केटमधून चांगल्या परताव्याचे आमिष पडले महागात; तरुणाची 26 लाखांची फसवणूक…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोंढव्यातील भागोदयनगर परिसरात तक्रारदार तरुण राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर सप्टेंबर महिन्यात संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमासुद्धा केले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले.

गेल्या चार महिन्यांत त्याने वेळोवेळी 25 लाख 99 हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी मोबाईल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments