Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजशेअर बाजारात 9 व्या दिवशीही मोठी घडामोड; सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला तर...

शेअर बाजारात 9 व्या दिवशीही मोठी घडामोड; सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला तर निफ्टी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : शेअर बाजारात मोठ्या घडामोडी दिसून येत आहे.त्यात गेल्या काही दिवसांपासून घसरण होताना दिसत आहे. सोमवारी बाजार उघडताच कोसळल्याचे पाहिला मिळाले. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार उघडताच खळबळ उडाली आहे. BSE सेन्सेक्स 608.83 अंकांनी घसरला आणि 75,330.38 अंकांवर पोहोचला. तर NSE निफ्टी 194.50 अंकांनी घसरून 22,734.75 अंकांवर पोहोचला.

सोमवारी सकाळी सेन्सेक्स – 525.92 अंकांनी घसरून 75,413.29 वर पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये विक्रीचा कल कायम दिसून आला. महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, झोमॅटो, टीसीएस, इन्फोसिस या समभागांच्या विक्रीचा जोर दिसून आला. बाजारातील सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना पाहिला मिळाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, एम अँड एम आणि इन्फोसिसच्या शेअर्सवर सर्वाधिक प्रभाव दिसला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँक 3.5% पर्यंत घसरले.

बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वाढीसह उघडले होते. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) च्या शेअर्समध्ये घसरण झाली. जे सुरुवातीच्या बाजारात 7.3% घसरले. तर ईझी ट्रिप प्लॅनर्सचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरून उघडल्याचे पाहिला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments