इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : शेअर बाजारात मोठी घडामोड दिसून येत आहे. अनेक शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहिला मिळाले आहे. यापैकी एक शेअर म्हणजे धानुका अॅग्रीटेक शेअर. हा शेअर दीर्घ मुदतीत उत्कृष्ट परतावा देणारा असा ठरत आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअर्समध्ये 60 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या कंपनीच्या एबिटा आणि नफ्यात लक्षणीय घट झाली असली, तरीही ब्रोकरेज कंपन्या या शेअरवर तेजीत दिसल्या.
धानुका अॅग्रीटेकने डिसेंबर 2024 तिमाहीत निव्वळ नफ्यात 21.31 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे जी डिसेंबर 2023 ला मागील तिमाहीत 45.37 कोटी रुपये होती, तर डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 21.31 टक्क्यांनी वाढून 5.4 कोटी रुपये झाला आहे. डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत विक्री 10.42 टक्क्यांनी वाढून 445.27 कोटी रुपये झाली.
धानुका अॅग्रीटेकचा शेअर बुधवारी 1,384.05 रुपयांवरून 2.49% वाढून 1,420 रुपयांवर पोहोचल्याचे पाहिला मिळाले. कंपनीचे एकूण बाजार भांडवल सुमारे 6500 कोटी रुपये होते. ऑगस्ट 2024 मधील 1,926.40 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून स्टॉक सुमारे 30 टक्क्यांनी खाली आहे.