Saturday, June 14, 2025
Homeक्राईम न्यूजशेअर बाजारात चढउतार कायम; 7 दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 315 अंकांनी घसरला

शेअर बाजारात चढउतार कायम; 7 दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 315 अंकांनी घसरला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. शेअर बाजारातील सात दिवसांचा तेजीचा कल गुरुवारी संपला. सेन्सेक्स 300 पेक्षा जास्त अंकांनी घसरून बंद झाला. त्यात हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले तर भारती एअरटेलचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरल्याचे पाहिला मिळाले.

बीएसई सेन्सेक्स 315.06 अंकांनी घसरून 79801.43 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 निर्देशांकही 82.25 अंकांनी घसरून 24246 अंकांवर आला. एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हरने गुरुवारी त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा 3.7% वाढून 2494 कोटी रुपये झाला. तसेच, कंपनीच्या महसुलात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुरुवारी, शेअर मार्केट सुरु होताच बीएसई सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला, तर निफ्टी 24300 अंकांच्या खाली आला. टाटा कंझ्युमर आणि इटरनल दोन टक्के घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स घसरणीसह उघडल्याचे पाहिला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments