Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजशेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानेः सनदी लेखापालाची तीन कोटींची आर्थिक फसवणूक;...

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानेः सनदी लेखापालाची तीन कोटींची आर्थिक फसवणूक; पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सनदी लेखापालाची तब्बल तीन कोटी तीन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा देण्याचे आमिष चोरट्यांनी सनदी लेखापालाला विश्वासात घेऊन दाखविले होते. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या सनदी लेखापालाने गुंतवणुकीसाठी एका बँकेकडून त्यामुळे दोन कोटी रुपयांचे कर्ज देखील काढले होते.

याबाबत एका ४९ वर्षीय सनदी लेखापालाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे सनदी लेखापाल एका नामांकित खासगी कंपनीत कामाला आहेत. फेब्रुवारी महिन्यात सनदी लेखापालाला सायबर चोरट्यांनी मेसेज पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी काळात चांगला परतावा मिळेल, असे खोटे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना एक अॅप देखील डाऊनलोड करण्यास सांगितले. चोरट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या सनदी लेखापालाने दोन बँकांकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज याकरीता काढले होते. गुंतवणूक केल्यानंतर सनदी लेखापालाला अॅपवर मिळालेल्या परताव्याची माहिती दिसत होती. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारातून पैसे काढण्या संदर्भात चोरट्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा मोठा परतावा तुम्हाला मिळाला असून, काही रक्कम सामाजिक कार्यासाठी द्यावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. परतावा न दिल्याने सनदी लेखापालाला संशय आला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments