इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील मुंढवा व पाषाण परिसरात सायबर चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. सायबर चोरट्यांनी घोरपडे पेठेतील महिलेसह पाषाणमधील एका व्यक्तीची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक करत दोन व्यक्तींचे तब्बल ४१ लाख रुपये लुटल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुंढवा आणि बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुंढवा व पाषाण परिसरात सायबर चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. सायबर चोरट्यांनी घोरपडे पेठेतील महिलेसह पाषाण भागातील एका व्यक्तीची ४१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. घोरपडे पेठेतील एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेचा विश्वास संपादन करून महिलेकडून त्यांनी एकूण २३ लाख ५० हजार रुपये बँक खात्यात जमा करून घेतले. त्यानंतर महिलेने काही कालावधीनंतर त्यांच्याकडे परतावा मागितला. मात्र चोरट्यांनी महिलेला पैसे दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत त्यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान, दुसरीकडे शहरातील पाषाणमधील ४४ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी १७ लाख ७४ हजार रुपये पळवले आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना १७ सप्टेंबर रोजी मोबाईलवर एक लिंक पाठवली होती. त्यानंतर मोबाईलवर एक अॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले होते. त्या अॅपवर जाऊन शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेतो, असा एसएमएस पाठविला होता. सुरुवातीला चोरट्यांनी त्यांना परताव्याची रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदाराने सायबर चोरट्यांना वेळोवेळी पैसे देऊन १७ लाख ७४ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा देणं बंद केलं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर तक्रारदाराने बाणेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.