इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात आता शेअर मार्केटमध्ये घसरण सुरू झाली असून, ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही आज पुन्हा रेड झोनमध्ये उघडल्याचे पाहिला मिळाले. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल चिन्हाने उघडले. BSE सेन्सेक्स -485.93 अंकांनी घसरून 75,250.03 वर पोहोचल्याचे दिसून आले.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहिला मिळाली. शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स 79 अंकांनी घसरून 75683 वर आणि निफ्टी 19 अंकांनी खाली येत 22893 वर गेल्याचे पाहिला मिळाले. लार्जकॅपच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये खरेदी दिसून येत आहे. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 278 अंकांनी वाढून 51428 वर आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 203 अंकांनी वाढून 15950 वर पोहोचला होता. तर निफ्टी मेटल निर्देशांक एक टक्क्याहून अधिक वाढीसह व्यवहार करताना दिसला. तर रियल्टी, एनर्जी आणि इन्फ्रा अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
ऑटो, आयटी, फायनान्शियल सर्व्हिसेस, फार्मा आणि एफएमसीजीमध्ये घसरण दिसली. झोमॅटो, एनटीपीसी, टाटा स्टील, एल अँड टी, भारती एअरटेल, टीसीएस, इंडसइंड बँक, अदानी पोट्र्ट्स, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, एसबीआय, एचसीएल टेक आणि टायटन सेन्सेक्समध्ये वाढल्याचे दिसून आले. तर कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, इन्फोसिस आणि सन फार्मा यामध्ये घसरण दिसून आली.