Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजशिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा; लोणी काळभोर येथे राष्ट्रवादीचे आंदोलन

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा; लोणी काळभोर येथे राष्ट्रवादीचे आंदोलन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने करण्यात आली.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील भक्ती-शक्ती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 29) आंदोलन केले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या काम प्रकरणी कसून चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, युवराज काळभोर, रमेश काळभोर, सचिन काळभोर, अमर गायकवाड, विश्वास गायकवाड, संदीप कुंजीर, जयेश कंद, विशाल वाल्हेकर, सुनील कांचन, प्रसाद कांचन, रोहिदास मुरकुटे, धनंजय टिळेकर, निकिता पवार, जनार्दन जोगदंड, वृषभ काळभोर, सतीश काळभोर, सिद्धेश्वर काळभोर, इब्राहीम मणियार, दिलीप गाडेकर, आदी राष्ट्रावादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळणे हा शिवरायांचा अवमान असून, या घटनेमुळे राज्याचा स्वाभिमान कोसळल्याचे निवेदनात नमूद केले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

हवेली तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर म्हणाले,” सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments