Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजशिरूर तालुक्यातील अरणगाव ठोंबरे वस्तीत दहशतः अज्ञात दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडयात एका...

शिरूर तालुक्यातील अरणगाव ठोंबरे वस्तीत दहशतः अज्ञात दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडयात एका वृद्ध महिलेचा खून, पती गंभीर जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून नुकतेच इंदापूर येथे एका हॉटेलमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. त्यानंतर रविवारी रात्री पुणे ते अहमदनगर रस्त्यावर शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरे वस्तीत अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण करून साडे आठ तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याचा प्रकार घडला आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून त्यांचा पती देखील गंभीर जखमी झाला असून त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संबधित परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर, पुणे) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात खून झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे. तर आनंदा सावळेराम ठोंबरे असे गंभीर जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी आनंदा ठोंबरे यांचा मुलगा बाबा ठोंबरे याने पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्या सोबत राहतात. रविवारी रात्री ते राहत्या घरी झोपले होते.

मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास अचानक अनोळखी दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात बळजबरीने शिरले. दरम्यान, आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य देखील जागे झाले. यावेळी दरोडे खोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलांबई या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. तर आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचावर औषध उपचार सुरू आहे.

दरम्यान, ठोंबरे दाम्पत्य यांच्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिक जागे झाल्याने दरोडेखोर तात्काळ पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून सीसीटीव्ही आणि श्वान पथकाच्य साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments