Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजशिरुर : सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडीचे देहूकडे प्रस्थान

शिरुर : सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडीचे देहूकडे प्रस्थान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी, सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी वारीमध्ये सहभागी होत असतात. पायी चालत देहूच्या दिशेने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारीत दंगुन जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी मार्गस्थ झाली आहे.

प्रस्थानावेळी डोक्यावर तुळस, खांद्यावर भागवत धर्माची पताका, गळ्यात वीणा, टाळ, मृदंग हरी नामाचा गजर करत ज्ञानोबा तुकोबा जयघोष करत उत्साहात निघाली. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्याने शेतातील कामे मार्गी लावत वारीचा आनंद घेण्यासाठी वारकरी सज्ज झाले आहे. यंदा वारीमध्ये महिला पुरुषासह युवकांनी मोठा सहभाग नोंदवला. या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरीकांची योग्य ती खबरदारी दिंडी व्यवस्थापनाने घेतली आहे.

यावेळी गावातील स्थानिक प्रतिनिधी, युवामहिला, बालगोपालांनी सहभाग नोंदवला. ऊन पावसाचा खेळासह वरुण राजाने हजेरी लावत जलाभिषेक करत स्वागत करत सर्वांनी आनंद साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments