Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजशिरुर शहरातील बाबुराव नगर येथे चार जणांकडून एकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर शहरातील बाबुराव नगर येथे चार जणांकडून एकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती : शिरूर बाबूराव नगर येथील तरुणास शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग विलास कारले (वय 26, व्यवसाय खाजगी नोकरी सध्या रा. बाबूराव नगर ता. शिरूर जि. पुणे) (मुळ रा. पाथरे. ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी (दि. 27 ऑगस्ट) रोजी रात्री फिर्यादी सुयोग हे कृष्णा हिरा अपार्टमेंट् बाबुराव नगर शिरूर ता. शिरूर जि. पुणे येथे भोगावडे यांच्या फ्लॅट मध्ये असताना 1) अक्षय ढेरे (पुर्ण नाव माहित नाही), 2) अजय कोळेकर (पुर्ण नाव माहित नाही), दोघे रा. रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे व 3) एक अनोळखी इसम व एक अनोळखी महिला (नाव व पत्ता माहिती नाही) हे आले व काही एक कारण नसताना मारहाण व शिवीगाळ करू लागले. तेव्हा सुयोग त्यांना तुम्ही मला का मारत आहात, असे विचारले त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या महिलेने सांगितले की, तू माझी छेड काढली आहे.

त्यावेळी सुयोग त्यांना म्हणाला कि, मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कुठे राहता?, असे बोललो असता अक्षय डेरे म्हणाले की, तु पोलीस स्टेशनला चलं असे म्हणुन सुयोग यांना घराच्या बाहेर घेऊन आले व बिल्डींगचे खाली पुन्हा अक्षय डेरे याने काठी व अजय कोळेकर याने बेल्टने व अनोळखी इसमाने पाईपाने मारहाण केली. त्यानंतर पोलीस स्टेशनला चल असे म्हणाल्याने सुयोग हे त्याच्यासोबत गाडीवर बसले. गाडीवर बसल्या नंतर न्हावरा फाटा रोडला ते घेऊन गेले. त्यावेळी पुन्हा वरील लोकानी सूयोग याला मारून दुखापत केली व शिवीगाळ करून तु पोलीस स्टेशनला जर तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी देत निघुन गेले.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments