Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजशिरुर, दौंडसह जिल्ह्यात रोहित्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद; 48 गुन्हे घडकीस, तब्बल...

शिरुर, दौंडसह जिल्ह्यात रोहित्रांमधील तारा चोरणारी टोळी जेरबंद; 48 गुन्हे घडकीस, तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) शिरुर, दौंड, तालुक्यासह जिल्ह्यात महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेला यश आले आहे. याप्रकरणी 48 गुन्हे उघडकीस आले असून 500 किलो तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्ह्यात वापरलेली वाहने असा 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरी करणाऱ्या व चोरीचा माल खरेदी करणाऱ्या 9 जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

विशाल खंडू पवार (वय 25, रा. तांबेवाडी वडगाव सावताळ ता. पारनेर जि अहमदनगर), प्रदीप राजेंद्र शिंदे (वय 26 धंदा ड्रायव्हर रा. साकूर गाडेकर ता संगमनेर अहमदनगर), ओंमकार अजित घोडेकर (वय 19 धंदा ड्रायव्हर रा. साकुर घोडेकर मळा ता. संगमनेर जि. अहमदनगर), आदेश सयाजी भुजबळ वय 19), हर्षल राजेंद्र शिंदे (वय 24, रा. दोघेही साकूर, गाडेकरमळा ता. संगमनेर जि अहमदनगर), श्रीकांत शिवाजी जाधव (वय 22, रा. सातकरवाडी दहीवडी ता. शिरुर), करण नाना माळी (वय 19, रा. दहिवडी मांजरेवस्ती ता. शिरुर, मूळ रा. वांगदरी ता. श्रीगोंदा जि अहमदनगर), सोनू विकास धुळे (वय 18, रा आंबळे ता. शिरुर, मूळ गाव वाडेबोल्हाई, थेऊर ता. हवेली जि. पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दिपक पांडुरंग सांगळे (वय 27 धंदा भंगारविक्री रा. व्हाईटहाउस बोलेगाव फाटा नागपूर ता. जि अहिल्यानगर) असे चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारविक्रेत्याचे नाव आहे. आरोपींकडून तब्बल 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर व दौंड उपविभागात महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्र फोडून त्यामधील तेल बाहेर फेकून तांब्याच्या तारा बाहेर काढून चोरून नेले जात होते. त्यामुळे त्या ठिकाणाच्या परिसरात विजेचा पुरवठा खंडित होऊन त्याचा त्रास नागरिक विशेषतः तेथील शेतकरी वर्गास होत होता. विद्युत रोहित्र चोरी गेल्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असे, तसेच परिसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या.

सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्ह्यांची वेळ, गुन्ह्यांची कार्यपद्धती याचा आढावा घेवून योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली होती.

सदर पथक तपास करीत असताना सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. विद्युत रोहीत्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परीसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा माल भंगारविक्री करणाऱ्या दिपक सांगळे याला विक्री केल्याचे सांगितले. तसेच गुन्हा करण्यासाठी आरोपींनी पिकअप, दुचाकी वाहनांचा वापर केला.

दरम्यान, आरोपींकडून पोलिसांनी पिकअप व सहा मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यापैकी एक मोटार सायकल चोरीची आहे. तसेच गुन्ह्यात चोरी केलेले तांब्याच्या पट्टया व तारा असा 14 लाख 50 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी विशाल पवार याच्यावर 11 मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी प्रदीप शिंदे याचेवर 03 गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीचे गुन्ह्यात फरार आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, विभाग, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर विभाग, दौंड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, एकनाथ पाटील, अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ संजू जाधव, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे, अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, मपोना सुजाता कदम शिरूर पो स्टे चे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर पोलीस ठाण्यातील अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments