Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजशिक्षिकेचे शाळेत काळे कारनामे..! अधिकाऱ्यांनी केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

शिक्षिकेचे शाळेत काळे कारनामे..! अधिकाऱ्यांनी केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र येथे एक महिला शिक्षिका म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तिने स्वतः शाळेत जाण्याऐवजी दुसऱ्या महिलेला शाळेत शिकवायला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या हजेरीपटामध्येही या महिलेच्या खोट्या सह्या आढळल्या आहेत. ही घटना पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये घडली आहे. महिला शिक्षिकेने केलेला प्रताप लक्षात येताच तिला निलंबित करण्यात आलं आहे. भारती मोरे असं निलंबित करण्यात आलेल्या महिला शिक्षिकेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण अधिकारी गजानन शिंदे आणि प्रशासकीय अधिकारी राजकुमार बामने भोरच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक 1 मध्ये अचानक निरीक्षण करायला पोहोचले, तेव्हा शाळेमध्ये नियुक्त महिला शिक्षिका भारती मोरे कोणतीही पूर्वसूचना न देता सुट्टीवर होत्या. मात्र, शिक्षकांच्या हजेरी पटावर त्यांची सही होती. याचा तपास केला असता ही सही खोटी असल्याचं समोर आलं.

धक्कादायक माहिती आली समोर…

केलेल्या तपासात अनुपस्थित महिला शिक्षिकेच्या ऐवजी शाळेमध्ये दुसरी महिला शिकवत असल्याचं समोर आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारती मोरेने नियुक्त केलेल्या महिलेला शाळेत जाऊन शिकवण्यासाठी ठराविक पैसे द्यायची ऑफर दिली होती. हा धक्कादायक प्रकार उघडकीस झाल्यानंतर, शालेय अधिकाऱ्यांनी भारती मोरेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, भारती मोर या नोटीसला समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

महिला शिक्षिका निलंबित…

दरम्यान, कामावर अनधिकृतरित्या गैरहजर राहणे, कारण न देता मुख्यालय सोडणे, जबाबदारी प्रती निष्काळजीपणा दाखवणे, अनधिकृत व्यक्तीला स्वतःच्या कामाची जबाबदारी देणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणे तसंच शाळेच्या वर्गाची चावी अनधिकृत व्यक्तीला देणे, या आरोपांखाली महिला शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments