इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शिक्रापूर-पाबळरस्त्यावरुन जाणाऱ्या एका महिला ठोस देऊन भरधाव थार कार समोरील कारवर आदळून अपघात झाला. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत राधाकृष्ण रामा खंडागळे (वय ६४ रा. पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी शुभम देवचंद रणदिवे (रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) या थार कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर पाबळ रस्त्यावरुन राधाकृष्ण खंडागळे हे त्यांच्या पत्नीसह कारमधून शिक्रापूर बाजूने पाबळकडे चाललेले होते. समोरून भरधाव वेगाने आलेली थार कारची रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरात धडक बसून थार समोरील फोर्च्यूनर कारवर आदळून अपघात झाला. यावेळी दोन्ही कारचे नुकसान होऊन सदर अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या पल्लवी जितेंद्र नरवडे (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) तसेच फोर्च्यूनर कारमधील सुनंदा राधाकृष्ण खंडागळे (रा. पिंपरखेड ता. शिरुर) या दोघी महिला जखमी झाल्या आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहेत.