Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजशिक्रापूरमध्ये शेतातील वादातून भावाला मारहाण

शिक्रापूरमध्ये शेतातील वादातून भावाला मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिक्रापूरः किरकोळ कारणावरुन इसमाला मारहाण करुन जखमी केले. ही घटना शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे घडली. याबाबत रोहिदास सिताराम बालवडे (वय ४२ रा. राऊतवाडी, शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुदाम शिवाजी बालवडे व ग्रऋषिकेश सुदाम बालवडे (दोघे रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रोहिदास बालवडे यांनी शेतात पाणी दिलेले असल्याने त्यांनी त्यांचा चुलत भाऊ सुदाम यास शेतात पाणी दिलेले आहे, तू टँकर भरू नको असे म्हटले होते. त्यांनतर रोहिदास हे शेतात जात असताना सुदाम व त्यांचा मुलगा ऋषिकेश या दोघांनी त्यांना काठीने मारहाण करत गंभीर दुखापत केली. पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments