Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजशिक्रापुरात बसच्या धडकेत 30 वर्षीय महिलेचा मृत्यू; बस चालकावर गुन्हा दाखल

शिक्रापुरात बसच्या धडकेत 30 वर्षीय महिलेचा मृत्यू; बस चालकावर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या महिलेच्या दुचाकीला बसची धडक बसून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारिका पांडुरंग खराडे (वय 30, रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ, रा. खेड ता. धाराशिव जि. धाराशिव) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश श्रीराम म्हस्के असे बस चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे सारिका खराडे ही महिला तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसासाठी गेली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून सारिका खराडे आणि विकी जगताप हे दोघे एम एच 12 एच जि 2414 या दुचाकीहून शिक्रापूर बाजूने कोरेगाव भीमाकडे निघाले होते. त्यावेळी स्वागत हॉटेल समोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच ०3 सि पी 2526 या बसची सारिका यांना जोरदार धडक बसली. या अपघातात सारिका गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर अपघातात सारिका खराडे यांचा मृत्यू झाला असून विकी जगताप हे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत पांडुरंग नारायण खराडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बसचालक गणेश म्हस्के याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र पाटील हे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments