इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिक्रापूर : दुचाकीला ट्रॅव्हल्स बसची धडक बसून झालेल्या अपघातात एक युवक ठार, तर एक जण जखमी झाला. ही घटना शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर घडली. स्वरूप तारिणी समान्ता (वय ३५ सध्या रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. ताकीपूर निमडांगी ता. पुरशा जि. हुगली प. बंगाल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. प्रशांतकुमार ब्रज मोहन बेहरा (वय ३५ सध्या रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. ओरिसा) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु करण्यात आले आहेत. याबाबत दत्तात्रय महादेव निळूगडे (वय ३१ रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. साजूर ता. कराड जि. सातारा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कृष्णा माधवराव पट्टेवाड (वय ४० रा. वजूर ता. पूर्णा जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-नगर महामार्गावरून स्वरूप समान्ता व प्रशांत बेहरा हे दोघे दुचाकीहून चाललेले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्स बसची दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान नागरिकांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना उपचारापूर्वी स्वरूपचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहेत.