इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे): उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील शिंदवणेग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आंब्याचा मळा परिसरातील वळणावर एक पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 25) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत 3 जण गंभीर जखमी आहेत. तर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरची पिकअप ही जेजुरी बाजूकडून उरुळी कांचनकडे निघाली होती. शिंदवणे हद्दीतील आंब्याचा मळा या ठिकाणी असलेल्या वळणावर पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पिकअप रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाले. जखमींना उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)