इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे): उरुळी कांचनशिंदवणे रस्त्यावर दोन दुचाकींचा झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 01) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिंदवणे रोड येथील शितोळे मळ्यात हि घटना घडली आहे.
याप्रकरणी काळूराम बाबुराव भंडलकर (वय 42, रा. शिंदवणे, पाचाळ वस्ती, ता हवेली), यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळूराम भंडलकर व त्यांच्या पत्नी रविवारी सायंकाळी उरुळी कांचन येथून आठवडे बाजार करून सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी निघाले होते. शिंदवणे येथे घरी जात असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात दुचाकी चालकाने काळूराम भंडलकर चालवत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
दरम्यान, या अपघातात काळूराम भंडलकर व त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्या. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तसेच दोघांनाही कोणतीही मदत न करता जखमी अवस्थेत तसेच सोडून पळून गेला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी काळूराम भंडलकर यांनी दिलेली तक्रारीनुसार अज्ञात चालकावर बी.एन.एस का. कलम 281,125 (B), मो. वा. का. कलम 184,134,177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.