Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजशासनाचे सर्व नियम व कायद्यांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा; वरिष्ठ पोलीस...

शासनाचे सर्व नियम व कायद्यांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा; वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांचे आवाहन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर आगामी गणेशोत्सवात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शासनाचे सर्व नियम व कायद्यांचे कसोशीने पालन करुन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी केले.

७ सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने विघ्नहर्ता न्यास पदाधिकारी,  गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, पोलीस पाटील यांची एक संयुक्त बैठक लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजेंद्र करणकोट बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, शिवशांत खोसे, हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, विघ्नहर्ता न्यासचे राजेंद्र बापू काळभोर, विशाल वेदपाठक, पोलीस पाटील दादासाहेब काळभोर, मिलिंद कुंजीर, पोलीस कर्मचारी, गणेश मंडळांचेपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र करणकोट पुढे म्हणाले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर होणारा हा तिसरा गणेशोत्सव आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत. ग्रामीण व शहर असा कुठलाही भेद न करता पोलीस तुम्हाला सहकार्य, मदत करण्यासाठीच आहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शासनाचे सर्व नियम व कायदे यांचे पालन करुन उत्सव साजरा करावा.

मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारी परवानगी पोलीस ठाणे पातळीवरच मिळेल. वाहतुकीला अडथळा होईल असा मंडप घालू नये, अधिकृत वीज पुरवठा घ्यावा, मंडपामध्ये श्रींच्या मुर्तीच्या व महिलांच्या सुरक्षेसाठी आपले कार्यकर्ते नियुक्त करावेत, प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूकीमध्ये वेळेचे बंधन कसोशीने पाळावे, गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. या नंतर ही काही अडचण आल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन यावेळी राजेंद्र करणकोट यांनी केले.

शहर पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या विघ्नहर्ता न्यासच्या स्पर्धेत आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरी गणेश मंडळांने बक्षीस मिळवावे, त्यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोत्कृष्ट मंडळांना लोणी काळभोर पोलीसांच्या वतीने तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत.

यावेळी विघ्नहर्ता न्यासचे विशाल वेदपाठक यांनी विघ्नहर्ता न्यास बद्दल उपस्थितांना माहिती दिली. ते म्हणाले पुणे शहरातील गणेशोत्सवाला विधायक स्वरुप देण्यासाठी गेल्या 25 30 वर्षांपासून सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना पारितोषक देण्याचे काम विघ्नहर्ता न्यासच्या वतीने करण्यात येते. सहभागी गणेश मंडळांच्या गणेशोत्सवातील व वर्षभर होणा-या समाजोपयोगी कामांच्या आधारावर पारितोषिके प्रदान केली जातात. यासाठी नियुक्त परीक्षक मंडळ सर्व गणेश मंडळांना भेट देतात.

सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, रामदास मेमाणे, रवी आहेर यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments