Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजशाळेला का जात नाहीस म्हणून आई अन् मुलामध्ये वाद; मुलाने संपवलं जीवन,...

शाळेला का जात नाहीस म्हणून आई अन् मुलामध्ये वाद; मुलाने संपवलं जीवन, काय चुकलं?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शाळा का चुकवतोस असा प्रश्न आईने विचारल्यानंतर एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मुलाला कोणता मानसिक आजार होता का? ज्यातून त्याने एवढं टोकाचं पाऊल उचललं असा प्रश्न उद्भवत आहे.

ही घटना बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील आहे. यश अनिल पाचंगे (रा. कुंभार मळा, बोरगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यश फक्त

१५ वर्षांचाच होता. यश वारंवार शाळा चुकवत असल्याने आई-वडिलांनी रागावल्याच्या कारणातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

यश हा इयत्ता आठवीत शिकत होता. तो बऱ्याच दिवसांपासून शाळेला जात नव्हता. हे वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला रागावले होते. वडिलांच्या बोलण्याने यश अजूनच रागात होता आणि शुक्रवारी (ता. २५) पुन्हा त्याने शाळेला जाण्यास नकार दिला. अशातच आई आणि मुलामध्ये वाद झाला.

यानंतर यश ‘शाळेला जातो’ असे सांगून शाळेची बॅग घेऊन घराबाहेर पडला. पण काही वेळातच त्याने जवळच असलेल्या आत्याच्या घरात वाशाला कापड बांधून गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोकांतिका पसरली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा शोध सुरु केला असून, मुलाने शाळेला जाण्याच्या कारणावरून हे पाऊल उचलले की यामागे आणखी काही कारण आहे. याचा तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments