Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजशाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत विनयभंग; हडपसर येथील उपमुख्याध्यापकाला शिक्षा

शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत विनयभंग; हडपसर येथील उपमुख्याध्यापकाला शिक्षा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला लष्कर न्यायालयाने दोन वर्ष कारावास तसेच १५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अटकारे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. सुरेश पांडुरंग सावंत (रा. हडपसर) असे शिक्षा सुनावलेल्या उपमुख्याध्यापकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मांजरी येथील एका शाळेत जुलै २०१७ मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी एका शिक्षिकेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी या शाळेत शिक्षिका आहेत, तर सुरेश सावंत याच शाळेत उपमुख्याध्यापक होता. सावंत काहीतरी कारण काढून शिक्षिकेला त्याच्या कार्यालयामध्ये बोलावून घेत त्यांच्याशी अश्लील वर्तन करायचा.

तसेच शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहायचा. १७ जुलै रोजी उपमुख्याध्यापकाने शिक्षिकेला मदत करण्याचा बहाणा करून कार्यालयामध्ये बोलावून घेतले आणि तिच्याशी अश्लील कृत्य केले, असे शिक्षिकेने फिर्यादीत नमूद केले होते.

या खटल्यात सहायक सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी बाजू मांडली. शिक्षकेची साक्ष, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सावंत याला शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम शिक्षिकेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी सुप्रिया गावडे यांनी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments