Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजशहीद वीर जवान अर्जुन बावस्कर यांना अखेरचा निरोप

शहीद वीर जवान अर्जुन बावस्कर यांना अखेरचा निरोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जळगावः सैन्यदलाचे वीर जवान अर्जुन बावस्कर यांना २४ मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेखास्थित डोपावा येथे कर्तव्य बजावीत असताना विरमरण आले होते. आज, २७ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो शोकाकुल नागरिकांनी ‘वीर जवान अमर रहे’ घोषणा देत अखेरचा निरोप देत त्यांच्या दोघा मुलांनी अग्नी डाग देऊन शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष भेटून कुटुंबाचे सांत्वन केले.

सिध्देश्वर नगर परिसरातील सम्राट नगरमधील व भारतीय सैन्य दलातील जवान अर्जून लक्ष्मण बावस्कर (३५) यांना अरुणाचल प्रदेशात धोपावा या ठिकाणी कर्तव्यावर विरमरण आले होते. लष्करी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे लष्करी वाहनाने घरी आणण्यात आले. त्यावेळी सोबत 10 महार रेजिमेंटचे सुभेदार जरनेल सिंग होते. तसेच संभाजीनगर वरून 97 आर्टिलरी ब्रिगेडचे लेफ्टनंट अमित शहा आलेले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बस स्थानक चौकातील तिरंगा ध्वजाजवळ मानवंदना देण्यात आली.

उप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिम यात्रा पोहचल्यानंतर बावस्कर यांना लष्कर, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, विविध राजकिय पक्ष, सामाजिक संघटना, नगर परिषद प्रशासन, माजी नगरसेवक, पंचक्रोशीतील माजी सैनिक व नागरिकांनी पुष्पचक्र अपर्ण करीत श्रद्धांजली वाहिली. लष्करी जवानांनी व पोलीस प्रशासनाने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार एकनाथ खडसे यांनी कुटुंबाला भेटून सांत्वन केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश प्रकाश पाटील, उप विभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी सचिन राऊत, सह पोलीस निरिक्षक जनार्धन खंडेराव, एस सिद्धीचे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक परिवार यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments