Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजशहरात मुसळधार पावसामुळे १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

शहरात मुसळधार पावसामुळे १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे १५ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या पडून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले. तसेच, वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यावरील फांद्या दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

शहर परिसरात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कोंढवा, येरवडा, स्वारगेट, कोथरूड, भवानी पेठ, धायरी, सहकारनगर परिसरात झाडे पडली. येरवडा परिसरातील ठाकरे चौकात मोटारीवर झाड पडून नुकसान झाले. तर, शंकर महाराज मठाजवळ वीज पडून झाड पेटल्याची घटना घडली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दुपारी साडेतीन ते सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत १५ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तर, काल गुरुवारी शहरात जोरदार पावसामुळे २१ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.

शुक्रवारी दुपारनंतर घडलेल्या झाडपडीच्या घटना-

दुपारी ३.३० वा. – कोंढवा खुर्द, शिशीतल पेट्रोल पंपाजवळ

३.३५ वा.- धायरी रस्ता, ज्योती बेकरीजवळ

३.३८ वा.- भवानी पेठ, मक्का मस्जिदजवळ

३.५६ वा.- एरंडवणा अग्निशामक केंद्राच्या बाजूला

४.०३ वा.- कोंढवा बुद्रूक

४.०५ वा.- येरवडा, सादलबाबा चौक

४.२० वा.- लोहियानगर

४.२२ वा.- कोथरूड, गिरिजा शंकर सोसायटी

४.३० वा.- स्वारगेट, वेगा सेंटर आणि स्वारगेट पोलिस लाईनजवळ

४.४० वा. – बिबवेवाडी रस्ता, कोठारी ब्लॉक

४.४५ वा.- महर्षीनगर, वैष्णवी डेअरीसमोर

४.४८ वा.- सहकारनगर

५.१० वा.- लोहगाव, साई शांती पार्क

५.१४ वा.- येरवडा, आंबेडकरनगर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments