इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणाने गारवा तर अचानक उन्हाचा तडाखा जाणवत आहे. आज पुण्यात किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर दिवसभर तापमान 24 अंश सेल्सिअस शक्यता वर्तवली जात आहे. हवामानात मोठे चढ-उतार होताना दिसून येत आहेत.
केवळ पुण्यातील नव्हे तर राज्यातील कमाल व किमान तापमान घटल्याचे पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवामानात गारठा पसरला आहे. कोकणामध्ये मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे सकाळी शहरात गारठा जाणवला.
महाराष्ट्राच्या अंतर्भागात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा खाली उतरला आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे किमान तापमानाचा पारा 10 ते 12 अंशापर्यंत खाली उतरल्याची गुरुवारी नोंद झाली आहे.