Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी अखेर अटकः कुख्यात गुंड गणेश मारणेला पाठलाग...

शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी अखेर अटकः कुख्यात गुंड गणेश मारणेला पाठलाग करत पकडले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले.

गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिस गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केली. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का लावण्यात आला.

दिवसाढवळ्या शरद मोहोळची हत्या

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात 20 हून अधिकजणांना अटक करण्यात आली आहे.

शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर काही तासांमध्ये सात जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर 15 जानेवारी रोजी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली होती.

प्रकरणाला वेगळं लागण्याची शक्यता

आतापर्यंत मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकरने इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. मात्र, पोलिस तपासात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पुणे पोलिसांनी आज नाशिकमधून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला गणेश मारणे याला अटक केली आहे.

पोलिसांकडून आधीच 24 जणांना अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्येप्रकरणी जवळपास 24 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना बेड्या ठोकल्या आहेत.

लग्नाच्या वाढदिवशीची झाडल्या होत्या गोळ्या

शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेलीय. शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले. सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली.

तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments